vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

खेळ प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे विभागात विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, रायफल शूटिंग, रोईंग, कुस्ती आणि टेबल टेनिस या आठ खेळांचा समावेश असून प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत खेळाडूंची निवड क्रीडा कामगिरी, कौशल्य आणि फिटनेस चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. १७ मार्च २०२६ पर्यंत विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, पुणे येथे प्रत्यक्ष किंवा deputypune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.

अर्जदाराचे वय त्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत २५ वर्षांखालील असणे आवश्यक असून जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, पालकांचे संमतीपत्र व शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच निवासी खेळाडूंसाठी निवास, भोजन, पूरक आहार, क्रीडा साहित्य, वैद्यकीय सुविधा आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागासाठी खर्चाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या निपुणता केंद्राच्या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन उपसंचालक क्रीडा व युवक सेवा युवराज नाईक यांनी केले आहे.

0000

0

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत लातूरला निवासी क्रीडा निपुणता केंद्र;ॲथलेटिक्स व कुस्ती खेळाडूंची ७ व ८ एप्रिल रोजी नैपुण्य चाचणी

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे