vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

राज्य प्रतिनिधी-जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन-संवर्धनासोबत पर्यटनविकासाला गती देण्याच्या दृष्टीने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंगल यांनी लोणार येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीत त्यांनी लोणार विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांवर भर देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या समवेत त्यांनी परिसराची पहाणी केली. सोबतच लोणार विकास आराखड्यासंदर्भाने एक बैठकही त्यांनी घेत सर्वंकष आढावा घेतला.

सरोवर परिसरातील सुरू असलेल्या बांधकामे, पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. लोणारचा विकास आराखडा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली

दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी लोणारमधील ऐतिहासिक झोपलेल्या मारुती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन काही प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. गायमुख धार पुन्हा धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन गोड्या पाण्याचा नियंत्रित उपसा करण्याचा प्रस्ताव, लोणारमधील प्राचीन मंदिरांना जोडून स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. या मागण्यांबाबत तांत्रिक बाबी तपासून आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात विभागीय वन अधिकारी (वन्यजीव, अकोला) यशवंत नागुलकर, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नगराध्यक्षा मीरा मापारी, मुख्याधिकारी बोबडे तसेच पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी व नगर परिषदेचे अभियंते उपस्थित होते.

लोणार सरोवराचा अद्वितीय नैसर्गिक वारसा जपत पर्यटनविकासाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

आज १४२ व्या जयंती निमित्ताने जालना शहर महापालिका तर्फे विनम्र अभिवादन.

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta