vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा व पॅनिक बटन या सारख्या सुविधा अनिवार्य कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत सोमवारी (दि.१६) दिले.

 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर, सुभाष भुजंग, मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

 बैठकीत निर्देश देण्यात आले की, जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक करण्यावर भर देण्यात यावा. विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे,जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटण तसेच महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यास संबंधित वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच सार्वजनिक वाहतुकीत शिस्त व विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ई-रिक्षा चालकांना वैध ड्रायव्हिंग लायसन्स, चालक बॅज, चारित्र्य पडताळणी व अन्य आवश्यक कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली. तसेच अवैध वाळू, गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील वाहतुक व रस्ते सुरक्षा सुरळीत राखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू..

vishwatmaklokswamivarta

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटीलअवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत..

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू