vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

      जालना, प्रतिनिधी उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात शनिवार, दि.14 मार्च 2026 रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये एकूण 713 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तब्बल 14 कोटी 33 लाख 77 हजार 450 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.    लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-03 के.व्ही. मोरे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-01 जी.आर. ढेपे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश बंडगर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष परमेश्वर गडगीळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे व इतर न्यायालयीन अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये एकूण 31856 प्रकरणे लोकअदालतीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138 आणि दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. या लोकअदालतीचे विशेष यश म्हणजे कौटुंबिक वादातील दोन प्रकरणे सामोपचाराने सुटली. परिणामी, दोन विभक्त राहणाऱ्या महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी नांदायला गेल्या असून दोन विखुरलेले संसार पुन्हा सुखाने बहरले आहेत. प्रलंबित प्रकरणे 6300 प्रकरणांपैकी 510 प्रकरणे निकाली निघाली. अशा प्रकारे एकूण 713 प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटवण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणी 25,556 प्रकरणांपैकी 203 प्रकरणे निकाली निघाली. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, बँक अधिकारी, पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

vishwatmaklokswamivarta