vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा शहरात रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत पार पडणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन मा. कांतीलाल डोंगरदिवे वधू-वर सूचक केंद्र यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमाचे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन त्रिशरण चौक बुलढाणा येथे आहे.

डोंगरदिवे वधू-वर सूचक केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी आजपर्यंत तब्बल १४७५५ पेक्षा अधिक विवाह जुळवून अनेक कुटुंबांना संसाराच्या वाटेवर मार्गदर्शन केले आहे. या यशस्वी परंपरेचा लाभ अधिकाधिक युवक-युवती व त्यांच्या पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे माननीय शिक्षण अधिकारी पृथ्वीराज तायडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे

या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेट, संवाद आणि माहिती देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच सुव्यवस्थित नोंदणी प्रक्रिया, स्वतंत्र कक्ष व्यवस्था आणि मार्गदर्शन सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१९५०७५८ / ८४९९९२५४२१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन!-भावपुर्ण श्रद्धांजली!!

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी-केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

vishwatmaklokswamivarta

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप