vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

कोल्हापूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कृषि पण मंडळार्फत आयोजित केलेल्या मिलेट व फळ महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला आज भेट देऊन त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले.

विशेषता मिलेटचा वापर करून तयार केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीचे त्यांनी विशेष कौतुक केले.मिलेट व फळ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी डॉ.अहिल्या वाघमोडे,फुड सायन्स विभाग प्रमुख,एसजीएम कॉलेज कराड यांचे मिलेटची ओळख व त्यांचा मानवी शरीरास होणारे फायदे या विषयावर व्याख्यान दिले.तिसऱ्या दिवशी डॉ.प्रतिभा ठोंबरे, कृषी विद्यान केंद्र कोल्हापूर यांनी मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅाल्यु एडिशन या विषयावर प्रबोधन केले.

       यावेळी मिलेट पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.परिक्षक डॉ.अहिल्या वाघमोडे डॉ प्रतिभा ठोंबरे,पुजा सावंत,तृप्ती कोळेकर, जयश्री करे यांनी प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या अनुक्रमे सोनल भोसले, मयुरी रानमाळे, श्रेया पोफळे तर उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणाऱ्या दिपाली देसाई त्यांचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल ३० लाखांची उलाढाल या मिलेट महोत्सावामध्ये झाली आहे.कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनीही या महोत्सवास भेट देऊन उपस्थित स्टॉलधारक शेतकर्‍यांशी चर्चा केली. आजचा दिवस (रविवार) हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून डॉ.संदीप पाटील यांचे सांय 5 वा मिलेटपर व्याख्यान आयोजित केले आहे. कोल्हापूरवासीयांनी या महोत्सवास भेट देऊन मिलेट व फळांचा आस्वाद घ्यावा व व्याखानास उपस्थित राहावे असे आवाहन पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांची शोकसभा संपन्न आठवणी व्यक्त करताना अनेकांना अश्रू झाले अनावर…

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण केंद्र यांच्या वतीने डॉ. सरोज घोष आणि डॉ. व्ही. एस. वेंकटवर्धन स्मृति व्याख्यानांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta