vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

राज्य प्रतिनिधी

‘मिशन भरारी’ हा केवळ उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा एक व्यापक प्रयत्न आहे. आपल्या मातीतल्या लेकरांना आभाळाशी नाते जोडण्याची ही संधी आहे. अल्पावधीत, केवळ तीन महिन्यांत हा उपक्रम प्रत्यक्षात उतरविणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे. पूर्वी सरकारी कामांना विलंब होत असल्याची धारणा होती; मात्र आज शासनाच्या कार्यपद्धतीत वेग आणि परिणामकारकता दिसून येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे औपचारिक अनावरण प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दि.२७ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण विभागाची माहिती

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन*