vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची प्रलंबित कामे 15 मे पर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची प्रलंबित कामे 15 मे पर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

        सांगली, प्रतिनिधी: सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनच्या अधिकाऱ्यांनी 15 मे पर्यंत संपूर्ण सांगली शहरातील गॅस पाईपलाईनची प्रलंबित कामे व कनेक्शनची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कचा जलद विस्तार करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आाढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन आणि पीएनजी याबद्दल जनजागृती व प्रसिद्धी महापालिका तसेच इतर संस्थांच्या मदतीने करावी. महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली रार्व स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वांना सोबत घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत. सीबीयुडी अॅपचा वापर करून सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनच्या अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण करावीत. सद्यस्थितीमध्ये एकूण ४२२ किलोमीटर गॅस पाईपलाईनच्या कागासाठी महानगरपालिका तसेच इतर संस्थांकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ३८० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम बाकी आहे, ती कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

        सर्व संबंधित एजन्सी धारकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल व या महिन्यांमध्ये देण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण झाल्याबद्दलचा आढावा घेण्यात येईल. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 31 मे पर्यंतच्या ना हरकत परवानग्या देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग- ७ ची पणजी वार्षिक परिषद

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…