vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

बुलढाणा, प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोग यांच्या दि. २६ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमानुसार चिखली तालुक्यात मुदत संपणाऱ्या ६० ग्रामपंचायती व १ नवनिर्मित ग्रामपंचायत अशा एकूण ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० जून २०२६ रोजी अमडापूर, धोत्रा नाईक, हरणी, बोरगाव काकडे, भोरसा-भोरसी, आमखेड, कवठळ, काटोडा, खैरव, रोहडा, गोद्री, माळशेंबा, पळसखेड दौलत, सोमठाणा, शेलूद, टाकरखेड हेलगा, करवंड, दहिगाव, धोत्रा भणगोजी, पेठ, टाकरखेड मु., अंत्री खेडेकर, मलगी, अमोना, वसंतनगर, शेळगाव आटोळ, मालगणी, अंत्री कोळी, सावरगाव डुकरे आणि केळवद या ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होणार आहे.

तसेच दि. ११ जून २०२६ रोजी इसोली, तोरणवाडा, वैरागड, तेल्हारा, एकलारा, नायगाव बु., गांगलगाव, भालगाव, कोलारा, चांधई, खोर, साकेगाव, येवता, दिवठाणा, सवणा, वळती, शेलसूर, मंगरूळ नवघरे, शेलोडी, शिंदी हराळी, उत्रादा, मेरा बु., मुरादपूर, भरोसा, अंचरवाडी, मंगरूळ इ., देऊळगाव धनगर, हातणी, भोगावती, ब्रम्हपुरी आणि किन्होळा येथे विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर विशेष ग्रामसभा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात येणार असून, ग्रामपंचायत सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. या विशेष ग्रामसभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

१५० पेक्षा जास्त ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती कचऱ्यात फेकण्याचे मोठे षडयंत्र; हिंदू समाजात तीव्र संताप !सरकारने तातडीने जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत  – हिंदु जनजागृती समितीची मागणी

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.-उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई  अजित पवार