vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात प्रशासन सज्ज•

 

नांदेड, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. 22 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट हॉल येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी-कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देवून, मतमोजणीपर्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी भोकर प्रविण मेगशेट्टी, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार संजय वारकड आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी व नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेबाबतचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी व नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल १ मे रोजी वाजणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार उद्घाटन

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

vishwatmaklokswamivarta

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार