vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सातारा, प्रतिनिधी: चालू वर्षात एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, जिल्ह्यातील पशुधनासाठी मुबलक आणि सकस चारा उपलब्ध करून देणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे. या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना (DPC) सन २०२६-२७ अंतर्गत, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात उच्च दर्जाच्या चारा बियाण्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून खरेदी करण्यात आलेली ही बियाणे थेट तालुकास्तरावरील पंचायत समिती आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांपर्यंत वितरीत करण्यात आली आहेत. हा संपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती श्रीमती लता कर्णे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागरीजन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. दिनकर बोर्डे यांच्या थेट देखरेखीखाली राबवला जात आहे

या मोहिमेत प्रामुख्याने हायब्रीड चारा बाजरी, गोड ज्वारी आणि मका यांसारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचा समावेश असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: एकूण ७,३०६ किलो हायब्रीड चारा बाजरी, १०.७२५ किलो हायब्रीड गोड ज्वारी २५,००८ किलो हायब्रीड मका (ADV-७५२) आणि २३,१७२ किलो हायब्रीड चारा मका बियाणे वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवांनी विनाविलंब आपल्या परिसरातील नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि हे बियाणे आपल्या ताब्यात घ्यावे. पावसाचे आगमन होताच ही बियाणे त्वरित पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून चारा टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवणार नाही आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता सुरक्षित राहून पशुपालकांचे होणारे नुकसान टाळता येईल. दुष्काळजन्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta