vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

 

कोल्हापूर प्रतिनिधी अल- निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.त्यामुळे जिल्ह्यात विविध प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिली.

                 खरीप हंगाम 2026–दुष्काळ व पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, रोहयो उपजिल्हाधिकारी शक्ती कदम,कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे,जिल्हा प्रशासनाधिकारी(न .पा) अजय पाटणकर, मनपा उपायुक्त नागेंद्र मुतकेकर हे प्रत्यक्ष तर मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील व जलसंपदाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

              जिल्हाधिकारी म्हणाले, जलसंपदा विभागाने उपलब्ध असलेल्या पाण्याचा मृत साठा (डेड स्टॉक) सोडून दहा टक्के पाण्याचा बफर स्टॉक करावा. पाणी वापराबद्दल जनतेत व्यापक जनजागृती करावी. त्याचबरोबर धरण क्षेत्र ठिकाणी असलेल्या पाणी गळती दुरुस्तीला अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात पाण्याच्या नळांना तोट्या बसविण्यात आले आहेत का ? याची संबंधित यंत्रणेने खातरजमा करावी. जिल्हा परिषदेने साधारणता 2 हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे कोणतेही कनेक्शन कट करण्यात येऊ नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

             जिल्ह्यात पशुधन जगावे यासाठी जानेवारी ते जुलै 2027 या कालावधीत विपुल प्रमाणात चारा निर्मिती करण्याचे प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हयात प्रथम कळ (ट्रीगर-1) मध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यांमध्ये सुमारे 80 टक्के इतके पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे हे दोन दिवसात करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

          तत्पूर्वी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एसटीपी पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार असल्याची माहिती अनुक्रमे आयुक्त डॉ भारुड व पल्लवी पाटील यांनी दिली.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवादसातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम,प्रत्येक अडचण सोडवून योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हाधिकारी वर्षा मीना

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …