vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रास्त भाव दुकानासाठी अर्ज मागविले

रास्त भाव दुकानासाठी अर्ज मागविले

 

व्यावसायिक प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर,  रास्तभाव, शिधावाटप दुकानाचे परवाने मंजुर करण्याकरीता जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले असून पंचायत, गट, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यात पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था इ. जिल्ह्यातील ग्रामीण भागात खालीलप्रमाणे रास्त भाव दुकानाचे जाहीर प्रगटन तहसिल कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये सर्व अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. ते याप्रमाणे-

१. रास्त भाव दुकान क्रमांक १८ रामपूरी ता.जि. छत्रपती संभाजीनगर

२. रास्त भाव दुकान क्रमांक १५७ कचनेर तांडा ता.जि. छत्रपती संभाजीनगर

३. रास्त भाव दुकान क्रमांक २०३ वडाची वाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर

४. रास्त भाव दुकान क्रमांक ८४ आडगाव सरक ता.जि. छत्रपती संभाजीनगर

५. रास्त भाव दुकान क्रमांक ५ अब्दीमंडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर

६. रास्त भाव दुकान क्रमांक २५ शरणापूर ता.जि. छत्रपती संभाजीनगर

या रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक पंचायत, गट, संस्था यांनी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून विहितनमुन्यात अर्जाची विक्री किंमत ३०० रुपये फक्त चलनाने बँकेत भरुन तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दि.३१ जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज विक्री होतील. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांना कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..

एम.सी.ई.डी. तर्फे मंगळवारी (दि.४) उद्योजकता विकास प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta