vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई प्रतिनिधी- राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपसचिव मिलींद शेणॉय, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेंतर्गत प्राप्त प्रशिक्षण संस्थाचे प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे. (मुंबई, ठाणे, पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक व अमरावती) निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थाच्या प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK), शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करणे अशा विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.000

संबंधित पोस्ट

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी* *राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी*

vishwatmaklokswamivarta

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta

परिसराबरोबरच वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एनएसएस युनिटच्यावतीने “स्वच्छता ही सेवा” अभियान

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश