vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

कुलदैवत म्हणजे काय?

कुलदैवत म्हणजे काय?

*कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.*

*आपला कुलदैवत कोण असतात?**कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदैवत’ असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घ्यावं असं म्हटल जात.*

*प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.*

*कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व.**पुराणात सांगितल आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे.*

*त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.*

*एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे?**कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत . अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.*

*कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?* *कुलदेवी/देवता माहीती नसल्यास खालीलपैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करावी.*

*कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. त्यामुळेच जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे *

*ग्रामदैवत हेच कुलदैवत असते का?**ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही.

 *कुळ म्हणजे काय?* *कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात .*

*काही जणांना वाटतं, कुळ म्हणजे जात. तर ते चुकीच आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे. परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी. यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.**कुलदैवत सगळ्या कुटुंबाला, आपल्या घराण्याला, आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो.*

संग्रहक – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर

संबंधित पोस्ट

श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त

vishwatmaklokswamivarta

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवा रविवार पासुन सुरुवात१३ सप्टेंबर रोजी शोभायात्रा, १४ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण

vishwatmaklokswamivarta

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

बदनापूर मध्ये ध्वजारोहण (मंडप उभारणी) सोहळा संपन्न.

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

गुरुवारी २२ जानेवारी २६ ला गणेश जयंती आहे त्यानिमित्ताने …….*

vishwatmaklokswamivarta