vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहरात 3 बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

ठाणे शहरात 3 बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

 

ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे पोलीस दलाकडून हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दल गोपनीय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करीत आहे. ठाणे शहरामध्ये जानेवारी 2025 ते अद्यापपर्यंत एकूण 3 बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून संबधितांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठाणे शहरामध्ये तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस दलाने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झिरो टोलरन्स’ धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

अनधिकृत शाळांपासून सावध राहा, फक्त शासन मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्या- शिक्षणाधिकारी प्राथमिक), बाळासाहेब राक्षे”

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta