vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मस्थानिक बातम्या

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

मुंबई प्रतिनिधी-

गेल्या अनेक वर्षापासून धारावीतून निघणाऱ्या ज्योतिबा भगवंताच्या यात्रेला खंड पडला होता ती यात्रा आता पूर्वत सुरू झाली आहे आज पोर्णिमा हनुमान जयंती याच्या शुभ मुहूर्तावर ज्योतिबाच्या नावानं चांगभलं नावाचा जयघोष करत यात्रा संपन्न होणार आहे

“जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा पुन्हा नव्याने समस्त  समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने आज दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

१५० वर्षांची परंपरा मागील ८ वर्षांपासून खंडित झाली होती ती यावर्षी पुन्हा नव्याने समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

ठिकाण :- “श्री.जोतिबा मंदिर” शिवनारायण बावडी, धारावी मेन रोड, बगीचा, सकिनाबाई चाळ,संत रोहिदास मार्ग कोळी वाडा, मुकुंद नगर ते काळा किल्ला पूर्वी प्रमाणे मार्ग असणार आहे, परत येते वेळीं संत कक्कया मार्ग ते श्री.जोतिबा मंदिर असा मिरवणूक सोहळा होणार आहे.

“आपली संस्कृती, आपला अभिमान”

प्रति कोल्हापूर यात्रा सोहळा फक्त धारावीतच होत असतो.

(अनेक राजकीय, सामाजिक संघटना आणि पत्रकार यांचे मनःपूर्वक आभार सर्वांनी सहकार्य करून ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे).आयुष्याच चांगभलं होण्यासाठी, गुलाल, खोबरे आणि दवणा श्री.जोतिबा देवाला अर्पण करून सुखी,समाधानी आणि निरोगी आयुष्य जगुया. !! नाही मोठं मागणं नाही मोठी हाव रं बापा सारखी माया तू लेकराला दे !! “जोतिबाच्या नावांन”चांगभलं चांगभलं चांगभलं…..

00000000

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

परेल – मासरंग एसटी सुरू करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय-देशातील रेल्वे स्थानकांवर चेहरा तपासणी यंत्रणा…

हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन