vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’

नागपूर, प्रतिनिधी: गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करत जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू,असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत कामठी येथील जयस्तंभ चौकात अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

♦बावनकुळे म्हणाले,तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ‘ऑपरेश थंडर’ अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या विविध कारवायांद्वारे ८ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी दिली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल**विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा*रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर*

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…