कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकणाचे अमर्याद सौंदर्य पर्यटन जगाला दाखवतो असा हा चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाची स्क्रीनिंग,माती आणि नाती जपणारा चित्रपट- संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकणाचे अमर्याद सौंदर्य पर्यटन जगाला दाखवतो असा हा चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाची स्क्रीनिंग,माती आणि नाती जपणारा चित्रपट- संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
बॉलीवूड प्रतिनिधी
कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकणाचे अमर्याद सौंदर्य पर्यटन जगाला दाखवतो असा हा चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाची स्क्रीनिंग,माती आणि नाती जपणारा हा पारिवारिक चित्रपट-प्रेक्षकांनी थेटर मध्ये जाऊन पहावा असे आवाहन संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स समूहाचे प्रमुख यांनी केले
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला”कुर्ला टू वेंगुर्ला” कोकणातील सत्य परिस्थिती कथा आणि व्यथा याबाबत चित्रपटाची स्क्रीनिंग कोकणातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आला होता
मराठी भाषा आणि संस्कृती जितकी दर्जेदार आहे तितका दर्जेदार चित्रपट एक अप्रतिम चित्रपट या टीमने बनवला आहे.
कोकणच्या लाल मातीतला चित्रपट जो कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकण अमर्याद सौंदर्य आणि पर्यटन जगाला दाखवतो असा चित्रपट प्रेक्षकांनी थेटर मध्ये जाऊन पहावा म्हणून कोकणातील अनेक संस्था एकत्र येऊन पुढाकार घेणार आहेत आणि याचा समन्वय मी स्वतः करणार आहे. आज या चित्रपटाचे कोकणातील कार्यकर्त्यांसाठी स्क्रीनिंग आयोजित केले होते. पहिल्या दिवशी या चित्रपटाचे वेगवेगळ्या संस्थांच्या आणि उद्योजकांच्या माध्यमातून 25 शो बुक झाले. मुंबई पुणे आणि कोकणातील सर्व संस्था आणि संवेदनशील कोकणातील उद्योजक हे या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये सहभागी होतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट प्रत्यक्ष पोहोचवण्याकरता प्रयत्न करतील अशी योजना आम्ही बनवत आहोत.
उपस्थिती दिग्दर्शक विजय कळमकर आणि निर्माते लेखक अमरजीत आमले, विशेष उपस्थिती व्हेंटिलेटर आणि फरारी की सवारी चे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, उद्योजक इंग्रजीत सावंत निर्माण ग्रुपचे राजेंद्र सावंत अजित मराठी मुंबई बँकेच्या कविता देशमुख, शास्त्रज्ञ अकल्पिता परांजपे, डॉक्टर कर्वे, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे राम कोळवणकर, मराठी एकीकरण समितीचे सचिन दाभोळकर मी उद्योजक होणारच चे प्रमुख निलेश मोरे, शिवस्वराज्याचे उद्योजक कार्यकर्ते अमित दुखंडे हरीश खेडेकर संदीप शिरदनकर, चित्रपट क्षेत्रातील सूर्यकांत कडकणे, पिकल डिस्ट्रीब्यूटर दीक्षित आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. चित्रपट पाहून सहभागी झालेले सगळे संवेदनशील कोकणातील कार्यकर्ते भारावून गेले आणि सर्वांनीच या चित्रपटाच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले .संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ,शिवस्वराज्य मराठी संघटना कोकण भूमी प्रतिष्ठान- ग्लोबल कोकण यांचे मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते