vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण आज, 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवंडी) देऊन हे प्रारूप आरक्षण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील 44, वरूड 43, दर्यापूर 49, अंजनगाव सुर्जी 34, अमरावती 46, भातकुली 36, नांदगाव खंडेश्वर 51, चांदुर रेल्वे 30, धामणगाव रेल्वे 55, तिवसा 30, मोर्शी 39 आणि चांदुर बाजार तालुक्यातील 41 अशा एकूण 498 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा तपशील समाविष्ट आहे. दरम्यान, हे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर काही आक्षेप किंवा हरकती घ्यायच्या असतील, त्यांच्यासाठी 25 जून 2026 ही अंतिम तारीख असणार आहे. शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात हे आक्षेप स्वीकारले जातील, तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन

vishwatmaklokswamivarta