vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती

    नवी मुंबई आरोग्य प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मा. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा अंतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक गुरुवारी विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू व साथरोगा बाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे.         दि. 04/06/2026 ते दिनांक 25/6/2026 या कालावधीत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 104 ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 36300 नागरिकांनी भेट दिली असून, 1718 रक्तनमुने घेण्यात आले. यामध्ये गुरुवार दिनांक 25/6/2026 रोजी आरोग्य परिरक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ व संपुर्ण आरोग्य समिती पथकाने सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे आयोजीत शिबीराच्या ठिकाणी भेट दिली.

      त्याचप्रमाणे सोमवार दि. 29/06/2026 रोजी वटपोर्णिमेचे औचित्य साधुन महिलांमध्ये विशेष जनजाग्रुती करणेकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती करण्यात आली असुन एकुण 25 शिबीरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकुण 10442 महिलांनी / नागरीकांनी लाभ घेतला असून, एकुण 153 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.

   सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, घर व परिसर स्वच्छता ठेवणे, पाणी उकळुन पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवुन वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली

         तसेच पावसाळा कालावधीत घरात, घराभोवताली, सोसायटी आवारात, टेरेसवर भंगार सहित्यामध्ये पाणी साचून ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती होते यास्तव पावसाळ्यामध्ये घरांतर्गत ड्रम, कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी, फेंगशुई, गॅलेरीत / गच्चीवरील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री अशा डासउत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात येते आणि बांधकामांवर विशेष लक्ष देऊन गप्पीमासे मोहिम राबविण्यात येते, जेणेकरुन सदर ठिकाणी डासउत्पत्ती होणर नाही.

         तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

हिंद दी चादर शहीदी समागमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदयाच्या कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta