सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
ठाणे प्रतिनिधी : सर्व सुधागड तालुका ठाणे शहर (जिल्हा) व उपनगर शहरवासी बंधू भगिनींना कळविण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या सुधागड तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना, दिव्यांग व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी व तरुणांचा गुणगौरव, ज्येष्ठ सामाजिक व्यक्तीचा सत्कार समारंभ रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी 5+267, रोटरी क्लब ठाणे, महानगर पालिका शाळा क्र. 19, विष्णु नगर, नौपाडा ठाणे (प.) येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.
आपली संस्था ठाणे शहर (जिल्हा) व सुधागड तालुका आणि रायगड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी कार्यरत आहे. संस्थेचे विस्तृत, जनहित व विद्यार्थी हितवर्धक कार्य सर्वदूर सर्वश्रुत आहे. आपल्या संस्थेने सुधागड तालुक्यातील विविध मुलभूत समाजोपयोगी आणि सार्वजनिक भौतिक सुधारणा व त्यांच्या आधुनिकीकरणासाठी सदैव आग्रही राहणारी संस्था म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आता संस्थेने ठाणे शहरात स्वमालकीचे बहुउद्देशीय सभागृह नक्की करून गरुडझेप घेतली आहे. अर्थात सर्व क्षेत्रातील समाजबांधव, दानशूर व्यक्ती व संस्था यांचे भक्कम पाठबळ व सहकार्य संस्थेला अभिप्रेत व अपेक्षित आहेच आणि ते मिळेल असा विश्वास अध्यक्ष घाडगे यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे शहरात वास्तव्यास असलेन्या सुधागड तालुक्यातील संबंधित विद्यार्थी, पालक व व्यक्तींनी शनिवार, 25 जुलै 2026 पर्यंत खालीलप्रमाणे आपली माहिती संस्थेच्या कार्यालयात द्यावी किंवा संस्थेच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी संपर्क साधावा.
कार्यालयाची वेळ:- मंगळवार, गुरुवार व शनिवार सायंकाळी 7.00 ते 9.00 वा.
1) मार्च 2026 माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व विशेष प्रावीण्य प्रशस्तीपत्र किंवा गुणपत्रिका. 2) विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत शैक्षणिक मदत मिळणेसाठी पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थी व पालकांनी अर्ज व माहीत देणे. 3) 7 वी ते 9 वी इयत्तेत किमान 4 विषयांत 2 व अधिक गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.