vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

जालना, प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753H वरील कुंडलिका नदी येथे प्रमुख पुलाचे बांधकाम वेगाने सुरू असून या कामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरता पर्यायी (डायव्हर्जन) मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी सुरक्षित असल्याने 27 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 किंवा पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे अगोदर होईल) जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जालना यांच्या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 115 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

प्रशासनाने यापूर्वीही जड वाहनांना पर्यायी बायपास मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही जड वाहने अद्यापही तात्पुरत्या मार्गावरून जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. तसेच पुलाच्या बांधकामात अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी प्रवेशबंदीचे फलक, बॅरिकेड्स आणि इतर वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने जड व अवजड वाहनांसाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.

पर्यायी मार्ग :

जालनाकडून मंठा चौफुलीकडे जाणारी जड वाहतूक : अंबड चौफुली – कालिका स्टील चौफुली – कन्हैया नगर चौफुली – मंठा चौफुली.

मंठ्याकडून जालन्याकडे (अंबड चौफुलीकडे) जाणारी जड वाहतूक : मंठा चौफुली – कन्हैया नगर चौफुली – कालिका स्टील चौफुली – अंबड चौफुली.

जिल्हा प्रशासनाने सर्व जड व अवजड वाहनचालकांनी निर्धारित पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 139 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेमार्फत नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना;शेतकरी, व्यावसायिक व थकीत कर्जदार सभासदांनी योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

देशभरात मकर संक्रांतीचं पर्व- देशासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा*4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta