vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती* *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती* *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद*

लातूर, प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ विषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला.

जिल्हा वकील संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती ए. आर. निळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या विधी सल्लागार श्रीमती ए. आर. मेकले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव आणि ॲड. स्नेहा शिणगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भारतात स्त्रीला माता आणि शक्तीस्वरूप मानले जात असताना स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. गिरवलकर यांनी यावेळी नमूद केले.

श्रीमती ए. आर. निळेकर आणि श्रीमती ए. आर. मेकले यांनी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यातील तरतुदी, नियम, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, पंचनामा करण्याची पद्धत तसेच कायद्याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबी याविषयी सविस्तर माहिती दिली.

ॲड. शिवकुमार जाधव यांनी गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा, आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि वाढत्या लोकसंख्येच्या आव्हानांबाबत समाजात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ॲड. स्नेहा शिणगारे यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे महत्त्व, सर्वसमावेशक न्यायव्यवस्थेची भूमिका तसेच आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण आणि त्याचे सामाजिक परिणाम यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे उपमुख्य न्यायरक्षक ॲड. जी. जे. मिटकरी यांनी केले, तर आभार ॲड. मंजुश्री शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. लहूजी चामे, सचिव ॲड. गुरुप्रसाद येरटे, सहसचिव ॲड. सिद्धेश्वर धायगुडे, कोषाध्यक्ष ॲड. नितीन राठोड यांच्यासह विधीज्ञ, अधिकार मित्र आणि पक्षकार उपस्थित होते.

****

संबंधित पोस्ट

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

मुंबईत कबुतरांना खायला घालणाऱ्यांची आता खैर नाही, पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल, दादर कबुतरखान्याच्या तोडकामाला जमावाचा विरोध- -कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. –

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

vishwatmaklokswamivarta