vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी

बुलढाणा, प्रतिनिधी): तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांनंतर संस्थेत रिक्त राहिलेल्या जागांसाठी अतिरिक्त प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश फेरी शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार आहे.

या प्रवेश फेरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि विहित शुल्कासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी अन्य संस्थेत प्रवेश घेतलेला असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी Proforma-N सादर करणे आवश्यक आहे.

दि. ११ ऑगस्टच्या फेरीनंतरही जागा शिल्लक राहिल्यास दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी उर्वरित जागांसाठी अंतिम अतिरिक्त प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. रिक्त जागांचा तपशील तसेच विहित शुल्काची माहिती शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या www.gpk.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य तथा प्रथम वर्ष प्रवेश समितीने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

vishwatmaklokswamivarta

वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस