vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवा रविवार पासुन सुरुवात१३ सप्टेंबर रोजी शोभायात्रा, १४ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवा रविवार पासुन सुरुवात१३ सप्टेंबर रोजी शोभायात्रा, १४ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण

 

प्रतिनिधी | बुलडाणा,अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद जाळीचा देवच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता बुलडाणा शहरातुन शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय श्रीमदभगवदगिता ज्ञानस्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. प पु प म आम्नाय आचार्य श्रीलोणारकर बाबा महानुभाव यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व्यक्तीमत्व विकास युवक मेळावा, श्रीमदभगवदगिता ज्ञान परिसंवाद स्पर्धा, दुपारी १२ वाजता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा, दुपाीर २ वाजता शोभायात्रा व सायंकाळी ७ वाजता कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी प्रात: काळी ५ वाजता देवपुजेस मंगलस्नान, श्रीमदभगवदगिता पारायण, ८ वाजता ध्वजारोहण, स्वागत, दीप प्रज्वलन, ९ वाजता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानावर प्रबाेधन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे तत्वज्ञानावर प्रबोधन श्रीमदभगवदगिता ज्ञानस्पर्धा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता पंचावतार उपहार व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

 — यांची राहणार उपस्थिती –प्रमुख आचार्यांमध्ये आम्नाय आचार्य श्रीमेहकरकर बाबा महानुभावा, आचार्य श्री पाथरीकर बाबा महानुभाव, आचार्य श्री भीष्माचार्यबाबा महानुभाव आचार्य श्री चिंचोडीकरबाबा महानुभाव यांची उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर, आ संजय गायकवाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आ श्वेता महाले, आ अमित झनक, आ अमोल जावळे, आ धीरज लिंगाडे, आ प्रविण तायडे, शेंदुर्णी नगराध्यक्ष गोविंदसेठ अग्रवाल, प्रमोद कोरडे, नरेश शेळके, डी एस लहाने, जयश्री शेळके, माजी आ विजय जाधव, जिल्हा केंद्रीय बँक अध्यक्ष डॉ राजेंद्र शिंगणे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, हर्षवर्धन देशमुख, जिल्हाधिकारी प्रविण देवरे, हेमंत काळमेघ, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, शुभांगी शिरसाठ ,ज्योती उके, तहसीलदार विठ्ठल कुमरे, पोलीस निरीक्षक संग्राम पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.

संबंधित पोस्ट

संत सहवासाची    *आनंदयात्रींची वारी पंढरीची*

भारताची सर्वोत्तम सांस्कृतिक वैभवताचे भव्य प्रदर्शन – भाव 2025 मध्ये 500 कलाकार, 30 नृत्य आणि संगीताचे प्रकार: आर्ट ऑफ लिव्हिंग गर्वाने भारतातील सर्वात मोठा लाईव्ह परफॉर्मन्स आर्ट इमर्शन – सीता चरितं सुरू केले.

vishwatmaklokswamivarta

जप करण्याचे फायदे आणि माहिती

vishwatmaklokswamivarta

दत्तजयंती निमित्त*श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र . एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे*.

vishwatmaklokswamivarta

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

vishwatmaklokswamivarta

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि संस्कृती शिखर परिषदेचा  समारोप*

vishwatmaklokswamivarta