vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर   उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर   उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

 

जालना प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर चार दिवसापासून  उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर चार दिवसापासून अन्य त्या उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करा मागणी- यासाठी अन्नत्याग उपोषण करण्यात आले आहे तरी शासनाने लक्ष देण्याची गरज  बेमुदत अन्नत्याग आंदोलन दिवस 4 था
प्रमुख मागण्या१) मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून तात्काळ दुष्काळी उपाययोजना हाती घ्याव्यात. 2)NDRF व SDRF च्या नियमात बदल करावा. 3)2026 खरीप पीक विमा मंजूर करावा.4) 2025_ 26 ऊस गाळप हंगामासाठी साखरेच्या वाढलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ₹1 हजार अतिरिक्त रक्कम राज्य सरकार व केंद्र सरकारने द्यावी.
5) 2024 खरीप पीक विम्याचे सर्व प्रलंबित दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावी व तसेच 2025 रब्बी फळपीक विमा मंजूर करा
6) मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळगळीची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 1 लाख रुपये द्यावेत.
7) प्रलंबित व प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करून व अस्तित्वात असलेल्या जलसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती करावी.8) जायकवाडीच्या डाव्या कालव्याची व उजव्या काव्याची व त्याच्या व्यतिरिकेची तात्काळ दुरुस्ती करावी.9) प्रत्येक गावाचा स्वतंत्र जलसिंचन आराखडा तयार करावा.10) जी रामजी योजनेचा 70 % व जिल्हा नियोजन समितीचा 70 %निधी जलसिंचनासाठी खर्च करावा.11) विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावे.12) 2012 ते 2025 पर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹1लाख प्रोत्साहन रक्कम द्यावी.दिनांक 16 सप्टेंबर २०२६ पासूनठिकाण=जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर उपोषणकर्ते गजानन रामनाथ उगले 9130450392 उपोषणाचा 6वा दिवस सुरू असून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी,कष्टकरी,व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळी येत आहेत

 

 

संबंधित पोस्ट

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाणशहरातील आझाद मैदानावर महोत्सवाचे आयोजन