vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

सायबर सुरक्षेसाठी ‘थिंक बिफोर क्लिक, व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट’चा अवलंब करा*खुलताबाद येथे लोकसंवाद अंतर्गत सायबर जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन*

*सायबर सुरक्षेसाठी ‘थिंक बिफोर क्लिक, व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट’चा अवलंब करा*खुलताबाद येथे लोकसंवाद अंतर्गत सायबर जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन*

छत्रपती संभाजनगर, प्रतिनिधी- इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक, अॅप किंवा एपीके फाइल उघडण्यापूर्वी विचार करा, मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची पडताळणी करा आणि ऑनलाइन असताना सतर्क राहा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत श्री शेतकरी मराठा गणेश मंडळ, मोठी कुणबी आळी, खुलताबाद येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सतीश बडे बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक परसराम बारगळ यांच्यासह गणेश।मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी ‘Think Before Click, Verify Before Trust आणि Alert Online’ हे सायबर सुरक्षेचे तीन महत्त्वाचे नियम नागरिकांनी दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले.*अनोळखी लिंक व APK फाइलपासून सावधान*अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, APK फाइल, आकर्षक संदेश किंवा संशयास्पद ऑफरवर तात्काळ विश्वास ठेवू नये. वाहतूक दंड, वीज बिल, केवायसी अपडेट, बँक खाते बंद होणे अशा विविध कारणांचा वापर करून नागरिकांना फसविण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे कोणतीही फाइल किंवा लिंक उघडण्यापूर्वी ती अधिकृत स्रोताकडून आली आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.पोलीस हवालदार गणेश घोरपडे यांनी नागरिकांना सोशल मीडिया, बनावट लिंक, संशयास्पद अॅप्स आणि फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. केवळ मोबाईल किंवा अँटीव्हायरसच्या सुरक्षेवर अवलंबून न राहता स्वतःची जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

*आकर्षक ऑफर आणि गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका*ऑनलाइन गुंतवणुकीत मोठा परतावा, कमी किमतीत महाग वस्तू, घरबसल्या मोठी कमाई, पैसे दुप्पट करण्याचे आमिष किंवा अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या आकर्षक ऑफर याबाबत नागरिकांनी सावध राहावे.

संबंधित पोस्ट

भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-बुलढाणा जिल्हा: महसूल प्रशासन आणि डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारच्या सरकारी विभागांना सायबर हल्ल्याचा धोका

राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाणन करणे आवश्यक..

vishwatmaklokswamivarta

प्रसार भारतीने सांस्कृतिक प्रसार वाढवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी प्रसारण साहित्य पुनर्प्रकाशनाचा मसुदा तयार केला आहे

vishwatmaklokswamivarta