vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक 

बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक

नवी दिल्ली प्रतिनिधी-
बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे.
पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेश्वर व्ही. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० आणि १०० रुपयांच्या एकूण १८ लाख २३ हजार ८०० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईत लॅपटॉप, हार्ड डिस्क, छपाई यंत्रे, स्क्रीन प्रिंटिंग फ्रेम्स तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेली इतर उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अंकित कुमार, गुरदीप सिंह ऊर्फ मन्नी, कुलवंत सिंह ऊर्फ काके आणि अमित अशी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

मुंबई पोलिसांच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची CEIR कारवाई; 100 चोरीचे/हरवलेले मोबाईल हस्तगत, ₹22.70 लाखांचा मुद्देमाल 

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.