vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थदर्शन यात्रेस प्रारंभ

सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या तिर्थदर्शन यात्रेस प्रारंभ…

 

राज्य प्रतिनिधी-

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा, यादृष्टीने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा’ ही अनेक गोरगरिबांना आपल्या इच्छापूर्ती करणारी यात्रा म्हणून महत्त्वाची आहे. पहिल्याच यात्रेत आमच्या कष्टकरी लाडक्या बहिणींना अयोध्या येथील तिर्थदर्शनाचा लाभ होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कोराडी महालक्ष्मी संस्थांच्यावतीने आयोजित तिर्थयात्रेचा शुभारंभ महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. वातानुकुलीत बसद्वारे सुमारे ५४ महिला यात्रेकरुंना यात संधी मिळाली.

यावेळी श्री.बावनकुळे यांनी महिन्यातून दोन वेळा ही यात्रा अयोध्याला जाईल. अनेक सर्वसामान्य बहिणींचे  तिर्थयात्रेला जाण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे. कालांतराने ही योजना मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रेच्या स्वरुपात अधिक परिपूर्ण करु, असे स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

खंडोबा देवाची यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतूक मार्गात बदल*

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन- २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत