vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील दलित, मागास स्त्रिया व उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक, शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या जिल्हयातील एका संस्थेस रु. १० हजार रुपये व एका व्यक्तीस ७ हजार रुपयांचा प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पात्र व्यक्ती व संस्थांकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

पुरस्कारासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संस्था व व्यक्ती यांना पोलिस अधिक्षक यांचा चारित्र्य दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) असणे गरजेचे आहे. पात्र संस्था व व्यक्ती यांनी आपले अर्ज 9 जानेवारी 2025 अखेर सायंकाळी 6.15 वाजेपर्यत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात पाठवावेत. संस्थेची व व्यक्तीची निवड ही निवड समितीमार्फत छानणीनंतर करण्यात येईल.  0000

संबंधित पोस्ट

जिल्हा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक गर्भपात-सोनोग्राफी केंद्र,गर्भपात गोळ्यांच्या विक्रीची तपासणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta