vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विशेष सहाय्य योजना; आधार प्रमाणिकरण,मोबाईल संलग्निकीकरण करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजना; आधार प्रमाणिकरण,मोबाईल संलग्निकीकरण करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड प्रमाणिकरण तसेच मोबाईल, संलग्निकीकरण करावे असे आवाहन तहसिलदार (संगायो) उत्तम बहुरे यांनी केले आहे. शहर विभागाअंतर्गत संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना इ. विशेष अर्थ सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे मासिक अनुदान डीबीटीद्वारे थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी तहसिलदार संजय गांधी निराधार योजना, शहर विभाग, आधार भवन छत्रपती संभाजीनगर येथे आधार कार्ड व डीबीटी प्रणाली अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. या योजनेच्या काही लाभार्थ्यांची उपलब्ध माहिती व आधार कार्डवरील माहिती यात तफावत आढळून येत आहे. काही लाभार्थ्यांनी आपल्या जन्म दिनांक तसेच आधार कार्डावरील नावातही बदल केला आहे, त्याबाबत कार्यालयास काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे आधार प्रमाणिकरण होत नाही. तसेच आधार कार्डला संलग्न मोबाईल लाभार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. तरी लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करावे तसेच आधार मोबाईल संलग्निकीकरण करावे,असे आवाहन तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे. आधार प्रमाणिकरण व संग्निकीकरण न झाल्यास माहे जानेवारी २०२५ चे अनुदान मिळणार नाही ,असेही त्यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

30 खाटाच्या रुग्णालयांना आवाहन

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद उपकरातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना;प्रस्ताव मागविले