vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

 

राज्य प्रतिनिधी -बुलढाणा, : सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुदृढ आरोग्यासाठी आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येईल, असे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या सत्काराप्रसंगी पत्रकारांना आश्वस्त केले.

मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली असून गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारांसाठी व्यापक स्तरावर आरोग्य शिबीराची मागणी केली होती. या मागणीला तात्काळ होकार देत केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी आरोग्य शिबीरासाठी आयुष मंत्रालय पुढाकार घेईल आणि पत्रकारांसाठी सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित केले जाईल, असे आश्वस्त केले.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठन करण्यात आले आहे. बुलढाणा दौर्‍यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री ना.जाधव यांनी अविरोध निवड झालेले जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख, सहसचिव शिवाजी मामलकर, महिला सेल जिल्हाध्यक्ष कु.मृणाल सावळे, सोशल मिडीया प्रमुख संजय जाधव यांचा सत्कार केला. याशिवाय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची आणि अधिस्वीकृती परिषदेच्या सदस्यपदी राजेंद्र काळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रा. युवराज वाघ यांनी या सत्कार सोहळ्याचे संचलन करीत नवीन कार्यकारिणीचा परिचय करुन दिला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके, चंद्रकांत काटकर, पत्रकार विश्वास पाटील, गजानन काळुसे, सुरेखा सोमनाथ सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी17 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta