vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जितो’ संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’जितो’ संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती..

राज्य प्रतिनिधी-अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा असून भारताच्या आर्थिक विकासयात्रेतही अनन्यसाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती, महिला आणि युवा शाखेची स्थापना आणि शपथविधी सोहळा सूर्या नगर येथील नैवेद्यम इस्टोरिया येथे पार पडला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, जितो शिखर संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारी, महासचिव ललीत डांगी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

मुख्यमंत्री म्हणाले की, जितो या संघटनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजसेवेचे कामही केले जाते. गरजूंपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम जैन संघटनेच्या माध्यमातून होत असते. भगवान महावीर यांनी आपल्याला सर्वसमावेशक विचार करण्याची शिकवण दिली आहे. हीच शिकवण आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वेल्थ, नोकरी आणि संधी निर्माण करणे यापेक्षा मोठी देशभक्ती नाही. आज आपण पाचवी अर्थव्यवस्था झालो आहे. तीन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढायचे असल्यास त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगातील विकसित देशांकडे पाहिल्यास त्यांच्या विकासात महिलांचेही योगदान लक्षणीय असल्याचे पहावयास मिळते. एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के हिस्सा असणारा महिला वर्ग हा अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची गरज आहे. भारतालाही विकसित अर्थव्यवस्था म्हणून 2047 पर्यंत पुढे यायचे असल्यास महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेला आजपासून सुरुवात,नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर–पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार  

vishwatmaklokswamivarta