vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

 

             नवी दिल्ली प्रतिनिधी- महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

संबंधित पोस्ट

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव