vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ प्रकरण जलद न्यायालयात चालविणे सर्व दोषींवर कारवाई  हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ प्रकरण जलद न्यायालयात चालविणे सर्व दोषींवर कारवाई  हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली

राज्य प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मसाजजोग चे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्यातर्फे संभाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली उड्डाणपूल तहसील ऑफिस एसपी ऑफिस सुरुवात करण्यात आली होती: कै. संतोष देशमुख हत्त्या प्रकरण जलद न्यायालयात चालवणे व हत्तेशी संबंधीत सर्व दोषींवर कारवाई करून हत्त्या करणान्यास फाशीची शिक्षा देणेबाबत. मागणी करण्यात आल

 बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झाली. हे हत्त्या प्रकरण जलद न्यायालयात चालविणे तसेच हत्तेशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी. व हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी. खालील प्रमुख मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील.खालील प्रमुख मागण्या ह्या गांभीर्याने घ्याव्यात.

१. कै. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.२. या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याला सहआरोपी करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.३. वाल्मिक कराड यांच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय मंडळींची एसआयटी चौकशी करावी.४. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करुन सहआरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.५. कै. संतोष देशमुख हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालविण्यात यावे.६. कै. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना शासनाकडून एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी तसेच त्यांच्या मुलीस शासकीय नौकरीत सामावून घ्यावे.७. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या गावास व कुटूंबियांस पोलीस संरक्षण देण्यात यावे.८. एसआयटी चौकशीसाठी नेमलेले अधिकारी हे बाहेरील विभागातील (झोन) असावे.९. स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना मारहाण करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी यांना बडतर्फ करावे. त्यांच्या कुटूंबियांतील सदस्यांना शासकीय नौकरीत सामावून घ्यावे. करिता जनआक्रोश मोर्चा काढून आपणास निवेदन देत आहोत. असे सांगण्यात आलेबीड जिल्ह्यातील मसाजजोग चे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्यातर्फे संभाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली उड्डाणपूल तहसील ऑफिस एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिस व अंबड चौफुली येथे विसर्जन करण्यात आला

संबंधित पोस्ट

दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह यावे-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन