vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन २०२४-२५या आर्थिक वर्षामध्ये १४ हजार ४०२ लाभार्थ्यांना एकूण रक्कम १२५ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली आहे.

  शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची विहीत मुदतीत पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत तीन लक्ष रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीच्या पीक कर्जाची विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३% व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. निकषानुसार घेतलेल्या पीक कर्जाची विहीत मुदतीत मुद्दल व व्याजासह पूर्णत: परतफेड करणारे शेतकरी या योजनेस पात्र ठरतात.

     सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १४ हजार ४०२ लाभार्थ्यांना एकूण रक्कम १२५ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने संबधी अधिक माहितीसाठी आपल्या बँक शाखेशी तसेच आपले तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाराहाते यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्तेसहायक संचालक नियुक्तीपत्रांचे प्रदान..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलवाहतुकीचा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta