vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

 

राज्य प्रतिनिधी –

प्रयागराज येथे महाकुंभ पर्वात कोट्यावधी हिंदू भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य शासनाने काटेकोर नियोजन केले असून देशाच्या विविध भागातील भाविकांना प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. मराठवाड्यातील भाविकांना दि. 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रेल्वे गाड्या टप्प्या- टप्प्याने जाणार आहेत. प्रवासात अडचणी येऊ नये यासाठी रेल्वे विभागातर्फे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास सुखकर होईल. असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांनी व्यक्त केला. तथापि भाविकांनी नियोजन करून सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन भास्करराव पाटील दानवे, रेल्वेचे विभागीय सल्लागार अर्जुन गेही, जालना स्थानक सल्लागार समितीचे प्रा. राजेंद्र भोसले, ममता कोंड्याल, शिवराज जाधव, बाबुराव भवर यांनी केले आहे. 0000000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta