vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना…

ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रक्कमेत (५०% सुट) सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे.झेङ राठोड यांनी केले आहे.

   महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रर्वगातील लाभर्थ्यांना स्वयंरोजगारकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडून वाटप झालेल्या थकीत लाभार्थ्यांना महामंडळाकडून थकीत व्याज दरात (५०% सुट) सवलत दि.३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपूरा, येथे भेट द्यावी अथवा दुरध्वनी क्रमांक ०२४०-२३४१५४४ वर संपर्क करण्याचे आवाहन‍ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जिल्हा व्यवस्थापक जे.झेङ राठोड यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. 

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कार्यालय सुसज्ज करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

 जिल्हा परिषद, ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर; ‘कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत मिळवला गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान