vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा*

 

पुणे प्रतिनिधी – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पुणे येथे समाज कल्याण आयुक्तालय येथे समाज कल्याण च्या विविध योजना आणि कामकाजाचा आढावा घेणारी बैठक झाली.यावेळी भिमकोरेगव येथील विजय स्तंभ स्मारक बाबत ही बैठक घेण्यात आली.येत्या 3 मार्च पर्यंत भीमा कोरेगाव येथील जमिनीचा न्यायालयात प्रलंबित असणारा खटल्याचा अंतिम निकाल लागणार आहे. साडे नऊ एकर जमिनीवर भीमा कोरेगाव स्तंभाचा परिसर असून येथील रिक्त जमीन भीमा कोरेगाव स्मारकासाठी भूमी अधिग्रहण त्वरित करावे त्यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करून स्मारकाचे संकल्पचित्र आणि प्लॅन त्वरित तयार करण्यात यावा असे निर्देश आज ना.रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्थानिक स्वराज्य संस्था; विधानसभा ; लोकसभा निवडणुका अनुसूचित जाती जमाती च्या राखीव जागांवर लढविण्यासाठी उमेदवारांनी निवडणुकी आधीच जात पडताळणी करावी याबाबत ची सूचना ना.रामदास आठवले यांनी केली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला ही आपण पत्र पाठवून सूचना करणार आहोत. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागांवर बोगस प्रमाणपत्रावर अन्य उमेदवार त्या जागा गिळंकृत करणार नाही अशी अपेक्षा ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

बार्टी च्या कांत्रती कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे; जात पडताळणी समितीच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आणि जात पडताळणी मधील दिरंगाई टाळावी याबाबत ना.रामदास आठवले यांनी निर्देश दीले

यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया; बारटी चे महासंचालक सुनील वारे; अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार; सह आयुक्त प्रमोद जाधव; प्रशांत चव्हाण; समाज कल्याण अधिकारी राधा किसन देव्हढे; विशाल लोंढे; स्वाती इथापे; गणेश मरकड; किशोर बडगुजर आदी अधिकारी आणि रामदास लोखंडे विजय मगरे; महेंद्र मानकर; शैलेश चव्हाण; संजय सोनवणे ; असित गांगुर्डे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .

0000000

संबंधित पोस्ट

राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाबाबत धोरण ठरणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे