vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            सांगली, प्रतिनिधी : राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात. या अनुषंगाने राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

   पत्रकात म्हटले आहे, राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या गुप्तगुणांना याय देणे, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात. राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांच्या गत तीन वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार आहे.

   सन 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख 50 हजार रूपये व संस्थेस 1 लाख रूपये, गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.

  अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा, संचालनालय आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे प्रसिध्दीत म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या सेवांसाठी आता ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष;जिल्हाधिकाऱ्यांची साहित्यिकांना सादभरपूर वाचनानंतरच लेखनाकडे वळावे: संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता