vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

        लातूर प्रतिनिधी- आपल्या हक्काचा साखर कारखाना व्हावा हे असंख्य शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न श्री संत गोपाळबुवा महाराज शुगर मिल्स या साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे. शेतकरी हीच जात आणि हाच धर्म समजून उसाचे अचूक वजन, इतरांच्या बरोबरीने रास्त भाव आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मानाची निश्चितपणे काळजी घेतली जाईल अशी हमी कारखान्याची चेअरमन राजेश कराड यांनी बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात बोलताना दिली.

 लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर परिसरात शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उभा राहत असलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मंगळवार चार फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता अध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य विद्यानंद सागर महाराज गातेगाव, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी, हभप लालासाहेब नाना पवार, हभप बाबा महाराज बोराडे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तत्पूर्वी श्री व सौ सौरभ कराड आणि श्री व सौ ऋषिकेश कराड यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीरामअण्णा कराड, बालासाहेबतात्या कराड, चेअरमन राजेश कराड, तेजस कराड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी, कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. पंधरा दिवसात प्रत्यक्ष गाळप सुरू करून मिळेल तेवढ्या उसाचे गाळप करून कोणत्याही परिस्थितीत चाचणी (ट्रायल) घेणार आहे मात्र पुढच्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी पूर्ण क्षमतेने आणि ताकतीने गळीत हंगाम सुरू करण्यात येईल असे सांगून यावेळी बोलताना चेअरमन राजेश कराड म्हणाले की, प्रयागअक्का यांच्या त्यागातून आणि समर्पणातून उभे राहिलेल्या कराड कुटुंबातील विश्वधर्मी डॉ वि दा कराडअण्णाभाऊ, आमदार रमेशआप्पा यांच्या आशीर्वादातून संत गोपाळ बुवा कारखान्याची उभारणी झाली असून निश्चितपणे यशस्वी वाटचाल करील. हा कारखाना जरी छोटा असला तरी वंचित आणि दबलेल्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जिवंत करण्यापूरती निश्चितपणे ताकद आहे. शेतकऱ्यांनी कराड कुटुंबावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि स्वाभिमानाला धक्का लागू देणार असे बोलून दाखविले.

    विश्वनाथजी कराड सरांच्या प्रेरणा घेऊन घेतलेला वसा पूर्ण करणारे राजेश कराड आणि त्यांच्या कुटुंबांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न ईश्वर पूर्ण करेल याची मला खात्री आहे असा आशीर्वाद देऊन परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यावेळी बोलताना म्हणाले की, परमात्मा प्रत्येकाला संधी देतो त्या संधीचं सोनं करायचं की माती हे ज्याची त्यांनी ठरवावे मात्र मिळालेल्या संधीचं परिपूर्ण सोनं कराड कुटुंबीयांनी करून दाखविले आहे. शेतकरी मेहनत करतो मात्र त्याला त्याच्या कष्टाचा हवा तो मोबदला मिळत नाही त्यांचे हे दुःख समजून घेऊन कराड परिवाराने कारखान्याची उभारणी केली तुम्ही साथ दिली त्यातूनच हा प्रकल्प उभा राहिला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर प्रत्येकाची त्या कामी निष्ठा असावी लागते असे सांगून या कारखान्याच्या कार्याला आणि प्रगतीला शुभेच्छा दिल्या.

अथक परिश्रम करणारे कराड कुटुंब असून बॉयलर अग्नी प्रदीपनाचा आजचा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आहे शेतकऱ्याच्या हिताचा हा साखर कारखाना अल्पावधीत कुटुंब भरारी घेईल अशा हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी शुभेच्छा दिल्या तर बाबा महाराज बोराडे यांनी वारकऱ्यांचा आदर गरिबांची तळमळ आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळा असणाऱ्या कराड कुटुंबीयांनी उभा केलेल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून तमाम शेतकऱ्याची जीवनमान उंचावेल असे बोलून दाखविले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी कारखान्याची कमी काळात उभारणी केली असे सांगून नाथसिंह देशमुख यांनी ऊस वेळेवर जावा आणि त्यांना योग्य तो भाव मिळावा एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा असल्याचे सांगितले.

  प्रारंभी ऋषिकेश कराड यांनी कारखान्याच्या उभारणीची माहिती देऊन उपस्थित सर्व शेतकरी सभासदांचे आपल्या प्रास्ताविकातून स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दशरथ सरवदे यांनी आभार मानले.

     याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, किसान मोर्चाचे विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, महेंद्र गोडभरले बन्सी भिसे, विष्णुदास मोहिते, वैभव सापसोड, वसंत करमोडे, सतीश आंबेकर, शाम वाघमारे, गोपाळ पाटील, डॉ बाबासाहेब घुले, विजय मलवाडे, प्रताप पाटील, राजकिरण साठे, संजय ठाकूर, पांडुरंग गडदे, बाबासाहेब भिसे, पद्माकर चिंचोलकर, भैरवनाथ पिसाळ, आदिनाथ मुळे, अशोक सावंत रशीद पठाण, महादेव गायकवाड, ललिता कांबळे, लता भोसले, जनाबाई साखरे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी भागधारक भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उष्माघातापासून काळजी घेण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त 20 कर्मचाऱ्यांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाप्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta