vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार-बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार-बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापि, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीक प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेला, जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे. यासाठी राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात आली असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाईन प्रणाली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राद्वारे यापूर्वी हे काम होत होते. केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने आता 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रति दिन 150 अर्ज हाताळण्यात येतील, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

राज्यात 8 नोव्हेंबर, 2024 पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, आजअखेर एकूण 5 लाख 12 हजार 581 अर्ज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत. सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेत, यामध्ये कामगारांची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास वेळ व रोजगाराचे नुकसान होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. कामगारांच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभता, सुसुत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारीत सूचना देण्यात आल्या असल्याचेही श्री.फुंडकर यांनी सांगितले.

कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले की, लाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राची उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजिकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा सुविधा केंद्रमधील पाच पैकी तीन कर्मचारी हे एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील. तर उर्वरीत दोन डाटा एंट्री ऑपरेटर बांधकाम कामगारांना त्याच्या तपशिल बदलाचे काम करतील. बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज दिनांक 31 मार्च, 2025 पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने या सर्व कामाकरिता मंडळस्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११३ गावांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

महाराष्ट्र शासनाचे १० आणि १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत प्रलंबित व दावा पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार