vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

 

     जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यकमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 12 वी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. दि.11 फेब्रुवारी, 2025 ते दि. 18 मार्च, 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील एकुण 82 उपकेंद्रावर इयत्ता 12 वीच्या परीक्षा पार पडणार आहेत. राज्य शासनामार्फत 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे विशेष अभियान चालवले जात आहे. त्यासाठी, जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी ही या संदर्भात कठोर अमंलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

  दि. 11 फेब्रुवारी, 2025 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली असुन, सदर परीक्षे दरम्यान श्रीमती इं‍दिरा गांधी विद्यालय रामनगर सा. केंद्र क्रमांक 418 वर 03 कॉपीचे गैरप्रकार, सत्य शोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव ता. भोकरदन केंद्र क्रमांक 492 वर 04 कॉपीचे गैरप्रकार तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बदनापुर केंद्र क्रमांक 428 वर 2 कॉपीचे गैरप्रकार निदर्शनास आले.

तसेच आज (दि.12 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या हिंदी विषयाच्या परीक्षे दरम्यान सिध्देश्वर उच्च माध्यमिक विद्यालय ढोकसाळ मंठा ता. मंठा येथे 2 कॉपीचे गैरप्रकार झाल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परीषद, जालना यांच्यामार्फत विभागीय सचिव विभागीय मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.****

संबंधित पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..