vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

राज्य प्रतिनिधी-रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालक सचिव डॉ. गोविंदराज यांनी क्षेत्रीय दौरा केला. त्यांनी अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, वायशेत येथे भेट देऊन शाळेतील विविध शासकीय योजनांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम, रोबोटिक व कोडींग लॅब, डिजिटल क्लासरूम आणि अटल टिंकरिंग लॅब यांसारख्या उपक्रमांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, अब्दुल कलाम लॉन्च वेहिकल मिशन 2021 अंतर्गत तीन विद्यार्थ्यांनी उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. गोविंदराज यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स आणि कोडींग लॅब मध्ये तयार केलेली मॉडेल्स सादर केली, तर डिजिटल क्लासरूम मध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची फी सेस फंडातून भरली जाते. तसेच, रायगड टॅलेंट सर्च या उपक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग, सराव चाचण्या आणि निवासी कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

डॉ. गोविंदराज यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतुक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार*

vishwatmaklokswamivarta

कोपरखैरणे विभागात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नगरसेवकांसह केली पाणी नमुने तपासणी*

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

राज्यासह मुंबईत अनेक शहरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू

vishwatmaklokswamivarta

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी