vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना मुंबईत ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना मुंबईत ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित

राज्य प्रतिनिधी- तसा पराक्रम कमी करू नका बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना मुंबईत ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याप्रसंगी सांगितले.

बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ‘चिराग ॲप’ विकसित करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी सांगितले.

बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमांत आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्थांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, उत्कृष्ट विशेषगृह, उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व, सहायक पोलीस आयुक्त, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस उपनिरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट बाल कल्याण समिती, पोलीस हवालदार, उत्कृष्ट बालगृह, पोलीस शिपाई, बालस्नेही पुरस्कार, पोलीस अंमलदार, उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी, उत्कृष्ट खुले निवारा गृह, उत्कृष्ट काळजी वाहक, उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षणाधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !’सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ मोहीम !…पण एसटीची ‘मृतावस्थेत’ असलेली हेल्पलाईन कधी बोलणार ?- सुराज्य अभियानाचा सवाल

vishwatmaklokswamivarta

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta