vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत- मंत्री उदय सामंत

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत- मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

 याबाबत सदस्य राजेंद्र गावित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.

  मंत्री श्री. सामंत म्हणाले, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास केंद्र शासनाने २०११ मध्ये मान्यता दिली होती. तसेच २०१५ मध्ये २४.६४ कोटी रुपये खर्चून प्रकल्प पूर्ण करण्यात आला. मात्र, २०२१ मध्ये चरण भट यांनी हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली.

    या प्रकरणात ३ मे २०२३ रोजी एनजीटी ने महानगरपालिकेला एप्रिल २०२० पासून प्रतिमहा १० लाख रुपये पर्यावरणीय भरपाई म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. महानगरपालिकेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले आणि १२ डिसेंबर, २०२३ रोजी न्यायालयाने या आदेशावर स्थगिती दिली. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असून, २०२३ मध्ये पडून राहिलेला तसेच दैनंदिन कचरा व्यवस्थापित करण्यासाठी DBFOT (Design, Built, Finance, Operate, Transfer) तत्वावर नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

0000

संबंधित पोस्ट

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…