vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग ( प्रतिनिधी– “जनसेवेचे कार्य महान, १०० दिवसांची टीबी मुक्त भारत मोहीम” या उपक्रमाचा भाग म्हणून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, अलिबाग येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात क्षयरोग निर्मूलनासाठी शपथ घेण्याचा संकल्प करण्यात येणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच क्षयरोग जनजागृतीसाठी विविध माहितीपर सत्रे आयोजित केली जाणार आहेत.कार्यक्रमास जिल्हाधिकारी, किशन जावळे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टवाड,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता, डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मनीषा विखे, डॉ. श्वेता अरोरा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

सर्व नागरिकांना कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहुलकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योग प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली