vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

*नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी यांची भरती सुरू असून तशा प्रकारच्या खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे काही जणांना महानगरपालिकेचे खोटे लेटरहेड वापरून त्यावर महानगरपालिकेचे बोधचिन्ह व खोटा शिक्का वापरून नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र देखील प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत संबंधित उमेदवारांकडून पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेकडूनही पोलीस विभागाकडे रितसर तक्रार करण्यात आलेली आहे.

  वास्तविकत: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

    नवी मुंबई महानगरपालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेची वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार

vishwatmaklokswamivarta

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

मच्छीमारांनो सावधान..!1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta