vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार! पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी दिशाभूल करणारी जाहिरात हटवली; पण दोषींवर कारवाई कधी? – सुराज्य अभियान

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार! पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी दिशाभूल करणारी जाहिरात हटवली; पण दोषींवर कारवाई कधी? – सुराज्य अभियान

    राज्य प्रतिनिधी-   हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात अखेर सोशल मीडियावरून हटवली आहे; मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सुराज्य अभियानाच्या वतीने श्री. सतीश सोनार आणि श्री. रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन ही जाहिरात म्हणजे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा गंभीर प्रकार असल्याचे निदर्शनास आणले. या भेटीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

  ही जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे.

 जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचा अवमानही करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.श्री. अभिषेक मुरुकटे समन्वयक, सुराज्य अभियान

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता नकोआमदार सुधाकर अडबाले यांचे मंत्र्यांना निवेदन

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर